सिकलसेल आजार जनजागृती सप्ताह, ११ ते १७ डिसेंबर
जनजागृतीची नवी उमेद – प्रतिबंध, तपासणी व आरोग्य संरक्षणाचा संदेश अकोला, 11 डिसेंबर (हिं.स.)। दरवर्षी ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सिकलसेल आजार जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. या विशेष सप्ताहाचे उद्दिष्ट म्हणजे सिकलसेल आजाराबद्दल समाजात जागरूकता
सिकलसेल आजार जनजागृती सप्ताह, ११ ते १७ डिसेंबर


जनजागृतीची नवी उमेद – प्रतिबंध, तपासणी व आरोग्य संरक्षणाचा संदेश

अकोला, 11 डिसेंबर (हिं.स.)। दरवर्षी ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सिकलसेल आजार जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. या विशेष सप्ताहाचे उद्दिष्ट म्हणजे सिकलसेल आजाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे, योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि प्रतिबंधात्मक पावले उचलण्यासाठी प्रेरित करणे.

सिकलसेल आजार काय आहे – सिकलसेल हा अनुवांशिक रक्तविकार आहे. या आजारात हिमोग्लोबीनची रचना बदलते आणि लाल रक्तपेशी वाकड्या–टोकदार (सिकलच्या आकाराच्या) होतात. त्यामुळे त्या शरीरात सहज अडकतात, रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतात आणि विविध आरोग्य समस्या उद्भवतात. हा आजार पालकांकडून जनुकाद्वारे पुढच्या पिढीकडे जातो.

जनजागृती सप्ताहाचे महत्त्व - हा सप्ताह साजरा करण्यामागील मुख्य हेतू पुढीलप्रमाणे.

प्रतिबंधात्मक तपासणीचे महत्त्व

१)सिकलसेल जनुक चाचणी (Screening) ही आजार टाळण्यासाठीची सर्वात महत्त्वाची पायरी आहे. विवाहापूर्वी किंवा लवकर वयात तपासणी केल्यास पुढील पिढीच्या आरोग्यासंबंधी निर्णय अधिक समजून घेता येतात.

२) लोकांमध्ये योग्य माहितीचा प्रसार - सिकलसेल आजाराबद्दल अनेक गैरसमज समाजात रूढ आहेत. हा संसर्गजन्य नसून वारशाने होणारा विकार आहे, याबद्दल जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.

३)रुग्ण व कुटुंबांना आधार

सिकलसेल असलेल्या व्यक्तींना वेळोवेळी वेदना, अशक्तपणा किंवा गुंतागुंत येऊ शकते. त्यासाठी योग्य काळजी, पोषण आणि वैद्यकीय सल्ला मिळण्यासाठी समाजात सहानुभूती व सकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात राबवले जानारे उपक्रम-

• जनजागृती मोहीम व मार्गदर्शन शिबिरे

• सिकलसेल तपासणी शिबिरे

• शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायत स्तरावर जनजागरण कार्यक्रम

• रुग्णांसाठी आरोग्य सल्ला व पोषण मार्गदर्शन

• स्वयंसेवी संस्थांकडून समुपदेशन व मदतकार्य

सिकलसेल आजार हा आजही भारतातील अनेक कुटुंबांसाठी चिंता निर्माण करणारा मुद्दा आहे. मात्र योग्य जागरूकता, तपासणी आणि वैद्यकीय मदत मिळाल्यास या आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे.

आवहान

• स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची तपासणी करून घ्या.

• योग्य माहिती शेजाऱ्यांपर्यंत, मित्रपरिवारात पोहोचवा.

• सिकलसेल रुग्णांबद्दल सहानुभूती आणि आधार दाखवा.

• आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा आणि आवश्यक तेव्हा वैद्यकीय सल्ला घ्या.

आपणही या जनजागृतीच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून समाजाला आरोग्यदायी भविष्य देण्यास मदत करू शकतो. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande