
कोल्हापूर, 11 डिसेंबर (हिं.स.) : महाराष्ट्रात वाढत्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ झालाच पाहिजे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले. महिलांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश-राजस्थान धर्तीवरील कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू करण्याची मागणीचे निवेदन २० जिल्ह्यातही देण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक अशोक गुरव, आप्पासाहेब गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे आणि उपशहरप्रमुख शशी बीडकर, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख गजानन तोडकर, दिलीप भिवटे हिंदु महासभेचे श्री. प्रशांत पाटील, श्री. विकास जाधव, रश्मी साळोखे, पूजा शिंदे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष विक्रम जरग, भाजपच्या वंदना बंबलवाड, हिंदू जागरणचे धर्मप्रचारक सनी पेनकर, मराठा तितुका मेळवावेचे योगेश केरकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे, श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य उपस्थित होते.
राज्यपाल, मुख्यमंत्री व गृह विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर येथील ७ वीत शिकणार्या मुलींवर झालेला सामूहिक अत्याचार, कोल्हापूर इचलकरंजी येथे ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार, शाहुवाडीतील १४ वर्षीय मुलीवर बलात्कार, तसेच श्रद्धा वालकर, रुपाली चंदनशिवे, तनुष्री शर्मा यांच्या हत्या या वैयक्तिक गुन्हेगारी नसून संघटित कट आहे. तरी महाराष्ट्र राज्यही उत्तर प्रदेश व राजस्थान राज्यांच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायद्यात आजन्म कारावासाची तरतूद असावी, गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र घोषित करावेत, तक्रार करण्याचा अधिकार पीडितांसह कोणत्याही नागरिकाला असावा, विशेष पोलीस शाखा आणि ‘रणरागिणी’ पथकाची स्थापना करावी, विदेशातून येणारा निधी, जिहादी नेटवर्क आणि तस्करीचा सखोल तपास करून मदत करणार्यांवर कठोर कारवाई करावी, जलद तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक प्रसारित करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar