म्हसळ्यात पतसंस्थेतर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन
रायगड, 11 डिसेंबर (हिं.स.)। म्हसळा तालुक्यातील कुणबी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, म्हसळा यांच्या २०२६ सालाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संस्थेच्या मुख्य कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन महादेव भी. पाटील,
दिनदर्शिका ठरेल मार्गदर्शक — म्हसळ्यात पतसंस्थेचा प्रकाशन सोहळा


रायगड, 11 डिसेंबर (हिं.स.)। म्हसळा तालुक्यातील कुणबी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, म्हसळा यांच्या २०२६ सालाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संस्थेच्या मुख्य कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन महादेव भी. पाटील, व्हाइस चेअरमन दिलीप मांडवकर, संचालक राजाराम तिलटकर, लहू तुरे, शंकर घोलप, महेश पवार, मीना टिंगरे, अर्पिता धोकटे, व्यवस्थापक प्रथमेश शिगवण, मुख्य लिपिक संजय गुलगुले, लिपिक गीता गिजे, कॅशियर सुजाता पोटले, स्वप्नाली शिगवण, कर्मचारी निलेश जाधव तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

या वेळी चेअरमन महादेव पाटील म्हणाले की, “संस्थेची दिनदर्शिका प्रत्येक सभासदाच्या दैनंदिन नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. वर्षभरातील कामकाज, आर्थिक नियोजन आणि महत्वाच्या तारखा लक्षात ठेवण्यासाठी ही दिनदर्शिका सदस्यांना मदत करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्था सर्व सभासदांच्या घरपोच ही दिनदर्शिका देणार आहे. संस्थेचे ध्येय, उद्दिष्टे, विविध योजना यांची सविस्तर माहितीही या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे सभासदांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे वर्षभराचे नियोजन सुलभपणे करता येणार आहे. “कुणबी पतसंस्थेचे नाव प्रत्येक घराच्या भिंतीवर दिनदर्शिकेद्वारे झळकते आहे, याचा आम्हाला आनंद आहे,” असे संचालक मंडळाने सांगितले.

संस्थेच्या प्रगतीविषयी बोलताना व्यवस्थापक प्रथमेश शिगवण यांनी सांगितले की, संस्थेची आर्थिक उलाढाल मागील काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. कर्ज वाटप, डिपॉझिट योजना, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज आदी विविध योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande