रायगड: हल्ल्यात ट्रकचालकाचा पाय मोडला
रायगड, 11 डिसेंबर (हिं.स.)। मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री एक धक्कादायक हल्ला घडला असून ट्रकचालकावर अचानकपणे जाड लाकडी बांबूने प्राणघातक प्रहार केल्याची घटना ९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पेण पोलीस ठाणे हद्दीतील
Horror near puncture shop! Truck driver's leg broken in sudden attack


रायगड, 11 डिसेंबर (हिं.स.)। मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री एक धक्कादायक हल्ला घडला असून ट्रकचालकावर अचानकपणे जाड लाकडी बांबूने प्राणघातक प्रहार केल्याची घटना ९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पेण पोलीस ठाणे हद्दीतील दत्तकृपा हॉटेल शेजारील पंक्चर दुकानाजवळ ही घटना घडली असून या प्रकरणी बिहारमधील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी हा ट्रक क्रमांक MH-04-KU-7091 घेऊन जात असताना टायरची हवा तपासण्यासाठी ते हॉटेललगतच्या जागी थांबले होते.

त्यावेळी तिथे उपस्थित आरोपी (रा. चैनपूर, ता. पानापुर, जि. छपरा, बिहार) याने काहीही कारण नसताना अचानकपणे हल्ला चढवला. त्याच्या हातातील जाड, जड लाकडी बांबूने फिर्यादीच्या उजव्या पायावर जोरात उपट मार करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यात फिर्यादीच्या पायातील नळीचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत फिर्यादीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात होते.

घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र पेण पोलिसांनी तत्पर कारवाई करत १० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५.१० वाजता आरोपीला पकडले. पोलिसांनी दाखल केलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामागे कोणताही वाद, भांडण किंवा ओळख नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून हल्ला पूर्णपणे विनाकारण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७३/२०२५ भा.दं.सं. २०२३ चे कलम ११८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विशाल झावरे हे करीत आहेत. या अकारण हल्ल्यामुळे महामार्ग वापरणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande