लुटेरी दुल्हनने २७ वर्षीय तरुणाला फसवले
मनमाड, 13 डिसेंबर (हिं.स.)। सध्या विवाहाची समस्या जटील झाली आहे. मुलांना विवाह करण्यासाठी मुली मिळत नसल्याने अनेक अडचर्णीना सामोरे जावे लागते. त्यातून ''लुटेरी दुल्हन'' असे किस्से देखील घडले आहे. एजंटमार्फत फसवणुकीचे प्रकारही झालेले आहे. असाच प्
लुटेरी दुल्हनने २७ वर्षीय तरुणाला फसवले


मनमाड, 13 डिसेंबर (हिं.स.)।

सध्या विवाहाची समस्या जटील झाली आहे. मुलांना विवाह करण्यासाठी मुली मिळत नसल्याने अनेक अडचर्णीना सामोरे जावे लागते. त्यातून 'लुटेरी दुल्हन' असे किस्से देखील घडले आहे. एजंटमार्फत फसवणुकीचे प्रकारही झालेले आहे. असाच प्रकार मनमाड शहरानजीक घडला.

एका २७ वर्षीय मुलाचा मुली सोबत एजंटने विवाह लावून दिला. नंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात एजन्टसह दहा व्यक्तींवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शहरापासून जवळच असलेल्या वंजारवाडी येथील २७ वर्षीय कृष्णकांत भाऊसाहेब गुंडगळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, परिवारातील लोक माझ्या विवाहासाठी मुलीचा शोध घेत होते. कोणी तरी माझ्या वडिलांना अशोक तान्हाजी काळे (रा. बोरसर, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) यांचा मोबाईल नंबर दिला. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एक स्थळ सुचवले. मुलगी गरीब आहे. तीच्या घरच्यांना आर्थिक मदत करावी लागेल, असे सांगून १ लाख ८० हजार रूपये देण्याचे ठरले. त्यांनी राणी सुखदेव पवार (वय २३, रा. दत्त कॉलनी, निफाड, जिल्हा नाशिक)

नावाची मुलगी दाखवली. पसंतीचा कार्यक्रम झाल्यावर नाशिक येथे विवाह झाला. दुसऱ्या दिवशी काही व्यक्ती आमच्या घरी आले. हे माझे आई, दोन बहिणी व त्यांचे पती आहे, असे सांगितले.

११ डिसेंबर रोजी पत्नी राणी ही तिच्या दाजी सोबत मोटारसायकलवर पळून गेली. तिने दिलेला पत्ताही खोटा असल्याचे लक्षात आले. जे लोक पत्नीचे नातेवाईक बनून आमच्या घरी आले होते. त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. माझ्या सोबतच आमच्या गावातील सागर बाळासाहेब जाधव (रा. कातरणी सध्या रा. वंजारवाडी, ता. नांदगाव) याला सुध्दा एजंट अशोक काळे याने कोमल अशोक तांबे (वय २८) हिच्याशी विवाह लावून दिला. पण या पूर्वीच कोमल हिचा दुसऱ्या ठिकाणी विवाह झालेला आहे. त्यामुळे माझी व

आमच्या गावातील सागर बाळासाहेब जाधव यांची अशोक तान्हाजी काळे याने फसवणूक करण्याच्या इराद्याने प्रत्येकी १ लाख ८० हजार असे एकूण ३ लाख ६० हजार रूपये घेऊन राणी पवार नामक आणि खोटा पत्ता असलेल्या मुलीशी विवाह लावून खोटे नातेवाईक दाखवून फसवणूक केली. याप्रकरणी आरोपी अशोक तान्हाजी काळे, वनिता अशोक काळे (रा. बोरसर, ता. वैजापूर), राणी सुखदेव पवार (रा. मखमलाबाद, नाशिक), आशा सुरेश हुल्हारे (पंचवटी, नाशिक), मिराबाई सुखदेव पवार (निफाड), संगिता खंडू सोनवणे (पंचवटी, नाशिक), कोमल आकाश तांबे (देवळाली गाव) आणि के जरीलाल लक्ष्मीलाल राका (विरार) आणि सोनल नावाची मुलगी व इतर दाखवलेले खोटे नातेवाईक यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande