गेवराईत अवैध वाळू उपशावर छापा; ९ लाखांची वाळू जप्त
बीड, 13 डिसेंबर (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील हिंगणगाव परिसरात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर गेवराई पोलिसांनी छापा टाकला. दोन ट्रॅक्टरसह नऊ लाख रुपये किमतीची वाळू जप्त करण्यात आली. एका शेताजवळ वाळू भरून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांन
गेवराईत अवैध वाळू उपशावर छापा; ९ लाखांची वाळू जप्त


बीड, 13 डिसेंबर (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील हिंगणगाव परिसरात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर गेवराई पोलिसांनी छापा टाकला. दोन ट्रॅक्टरसह नऊ लाख रुपये किमतीची वाळू जप्त करण्यात आली.

एका शेताजवळ वाळू भरून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे वाहन दिसताच दोन्ही ट्रॅक्टरचे चालक पळून गेले. घटनास्थळावरून दोन ट्रॅक्टर आणि वाळू असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईत पोलिस निरीक्षक किशोर पवार, एपीआय सतीश कोटकर, पीएसआय प्रदीप आढाव, पीएसआय श्रीमंत ऊबाळे, पीएसआय नितीन शिंदे, धीरज खांडेकर सहभागी झाले.

------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande