दिव्यांग विशेष सहाय्य योजनेच्या अर्थसहाय्यात वाढ
परभणी, 11 डिसेंबर (हिं.स.)। शासन निर्णयाअन्वये दिव्यांग विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मासिक अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानुसार लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसहाय्य रुपये 1 हजार 500 वरून 2 हजार 500 इतके करण्यात आले असून हे अ
दिव्यांग विशेष सहाय्य योजनेच्या अर्थसहाय्यात वाढ


परभणी, 11 डिसेंबर (हिं.स.)।

शासन निर्णयाअन्वये दिव्यांग विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मासिक अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानुसार लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसहाय्य रुपये 1 हजार 500 वरून 2 हजार 500 इतके करण्यात आले असून हे अर्थसहाय्य डी.बी.टी. पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे.

तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व दिव्यांगांना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि लाभ मिळण्यासाठी वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) अनिवार्य करण्यात आले आहे.

याअनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेंतील दिव्यांग लाभार्थ्यांचे युडीआयडी कार्ड व आधार कार्ड यांचे परस्पर संलग्नीकरण करणे आवश्यक आहे. तसेच युडीआयडी कार्ड क्रमांक व आधार क्रमांक संलग्न असल्याची खातरजमा करणे आवश्यक आहे.

परभणी तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना युडीआयडी कार्ड व आधारकार्ड तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन परभणी तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande