नंदुरबार - जलयुक्त शिवार अभियान 2.0; कामांच्या मुल्यांकनासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नंदुरबार, 11 डिसेंबर, (हिं.स.) जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी केलेल्या कामांचे त्रयस्थ (Third Party) मूल्यांकन करण्यात येणार आहे यासाठी इच्छूक संस्थांनी 22 डिसेंबर, 2025 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे, असे आवा
नंदुरबार - जलयुक्त शिवार अभियान 2.0; कामांच्या मुल्यांकनासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


नंदुरबार, 11 डिसेंबर, (हिं.स.) जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी केलेल्या कामांचे त्रयस्थ (Third Party) मूल्यांकन करण्यात येणार आहे यासाठी इच्छूक संस्थांनी 22 डिसेंबर, 2025 पर्यंत आपले प्रस्ताव

सादर करावे, असे आवाहन मृद व जलसंधारण अधिकारी तथा जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान 2.0 चे

सदस्य सचिव निलेश पाटील यांनी केले आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या निर्देशानुसार, जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व

शासकीय यंत्रणांनी केलेल्या कामांचे त्रयस्थ (Third Party) मूल्यांकन करण्यात येणार आहे.

या मूल्यमापनासाठी इच्छुक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालये,

जलसंधारण कामांचा अनुभव असलेल्या स्वयंसेवी संस्था आणि आयएसओ (ISO) मानांकित खाजगी

अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. कामाचा पूर्वानुभव असलेल्या संस्थांना

प्राधान्य दिले जाईल. निवड झालेल्या संस्थांनी मृद व जलसंधारण विभागाचे 22 ऑगस्ट, 2025 च्या पत्रातील

मुद्दा क्र. 2V मधील 01 ते 30 तपासणी सूचीत नमूद केलेल्या बाबींची माहिती मुल्यपापन अहवालात सादर

करणे बंधनकारक राहील.

इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव सर्व आवश्यक कागदपत्रांसह (प्रमाणपत्रांसह) जिल्हा जलसंधारण अधिकारी,

मृद व जलसंधारण विभाग, नंदुरबार यांच्या कार्यालयात 22 डिसेंबर, 2025 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत

सादर करावेत. अधिक माहितीसाठी, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी विनय कुळकर्णी भ्रमणध्वनी

क्रमांक 9404493245 यांच्याशी संपर्क साधावा, असेही मृद व जलसंधारण अधिकारी तथा जिल्हास्तरीय

जलयुक्त शिवार अभियान 2.0 चे सदस्य सचिव श्री. पाटील यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande