जळगावच्या ६ नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये तीन जागा बिनविरोध
जळगाव, 11 डिसेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या स्थगित झालेल्या निवडणुकांच्या प्रक्रियेला आज नव्या गतीने सुरुवात झाली असून उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर एकूण तीन जागा बिनविरोध ठरल्या आहेत. सावदा नगरपरिषदेत दोन तर भुसावळ नगरपरिषदेत
जळगावच्या ६ नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये तीन जागा बिनविरोध


जळगाव, 11 डिसेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या स्थगित झालेल्या निवडणुकांच्या प्रक्रियेला आज नव्या गतीने सुरुवात झाली असून उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर एकूण तीन जागा बिनविरोध ठरल्या आहेत. सावदा नगरपरिषदेत दोन तर भुसावळ नगरपरिषदेत एक जागा अनस्पर्धित राहिली आहे. उर्वरित नऊ जागांसाठी तब्बल ३७ उमेदवार रिंगणात कायम राहिल्याने या ठिकाणी चुरस अधिक तीव्र होणार आहे. माघारीच्या अखेरच्या तारखेनंतर सावदा येथील दोन आणि भुसावळ येथील एक अशी एकूण तीन जागांवर सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी निवडणूक प्रक्रिया थेट संपुष्टात आली आहे. नऊ जागांसाठी प्रत्येकी अनेक उमेदवार रिंगणात असल्याने स्पर्धा चुरशीची होणार असून मतदारांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.पूर्वनियोजित २ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ४५२ प्रभागांमध्ये मतदान झाले होते. त्यांची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती; परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे ती स्थगित करून आता २१ डिसेंबरला नव्या मतमोजणीसोबत घेण्यात येणार आहे. परिणामी जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या निकालावर केंद्रीत झाले आहे.अमळनेर प्रभाग 1 अ – 3 उमेदवार , सावदा , प्रभाग 2 ब – 1 उमेदवार (बिनविरोध) , प्रभाग 4 ब – 2 उमेदवार,प्रभाग 10 ब – 1 उमेदवार (बिनविरोध) ,यावल प्रभाग 8 ब – 2 उमेदवार, वरणगाव प्रभाग 10 अ – 7 उमेदवार ,प्रभाग 10 क – 4 उमेदवार , पाचोरा प्रभाग 11 अ – 2 उमेदवार , प्रभाग 12 ब – 3 उमेदवार , भुसावळ प्रभाग 4 ब – 10 उमेदवार , प्रभाग 5 ब – 1 उमेदवार (बिनविरोध) , प्रभाग 11 ब – 4 उमेदवार

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande