केळी उत्पादकांना हे शासन न्याय देणार आहे की नाही? - खडसे
नागपूर, 11 डिसेंबर (हिं.स.)मागच्या तीन चार महिन्यापासून केळी पिकाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. केळीला काही दिवसापूर्वी अवघा ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीय. दरम्यान केळी
केळी उत्पादकांना हे शासन न्याय देणार आहे की नाही? - खडसे


नागपूर, 11 डिसेंबर (हिं.स.)मागच्या तीन चार महिन्यापासून केळी पिकाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. केळीला काही दिवसापूर्वी अवघा ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीय. दरम्यान केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित केला. यावर खडसे म्हणाले की, राज्यभरात आज केळीचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर होतांना दिसत आहे. मात्र केळीला भाव नाही. यावर्षी ती दोनशे ते चारशे रुपयांचा भाव होता. हा भाव शेतकऱ्यांना परवडणार कसा? ५०% उत्पादन खर्चही त्यात निघत नाही. शेतकऱ्यांनी शेती अक्षरश: रोटोव्हेटर लावून साफ केली. कारण शेती तर खाली करायची होती. मात्र त्यासाठीही खर्च परवडणारा नव्हता. केळी उत्पादकांना हे शासन न्याय देणार आहे की नाही? वर्षानुवर्षापासून मागणी होत आहे की, केळी बोर्डाची स्थापना करावी जे केळीचे दर नियमित करेल. केळीची निर्यात करु शकेल. मात्र अमलबजावणी नाही. केळी विकास महामंडळाचे गाजर सत्ताधाऱ्यांनी गेल्या आठ-दहा वर्षात अनेक वेळा दाखविले. मात्र प्रत्यक्ष स्थापना नाही, असं खडसे यांनी विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande