दारूच्या नशेत पोलीस स्टेशनला धिंगाणा घालणारा तोतया पत्रकार जेरबंद
जळगाव, 12 डिसेंबर, (हिं.स.) तुम्हाला जेवढा पगार आहे तेवढे माझ्याकडे वाळूचे डंपर आहेत मी एकदा मंडप लावून उपोषणाला बसलो तर तुमच्या नोकऱ्या खाऊन टाकेल माझ्या नादाला लागू नका असे दारूच्या नशेत म्हणत पोलिसांच्या अंगावर हात उगारणाऱ्या भडगाव येथील स्वयंघो
दारूच्या नशेत पोलीस स्टेशनला धिंगाणा घालणारा तोतया पत्रकार जेरबंद


जळगाव, 12 डिसेंबर, (हिं.स.) तुम्हाला जेवढा पगार आहे तेवढे माझ्याकडे वाळूचे डंपर आहेत मी एकदा मंडप लावून उपोषणाला बसलो तर तुमच्या नोकऱ्या खाऊन टाकेल माझ्या नादाला लागू नका असे दारूच्या नशेत म्हणत पोलिसांच्या अंगावर हात उगारणाऱ्या भडगाव येथील स्वयंघोषित,खंडणीखोर तोतया पत्रकार विठ्ठल मराठे याच्यावर विविध कलमाद्वारे भडगाव पोलिस स्टेशनला गून्हा दाखल करण्यात आला असून त्याला तत्काळ अटक करण्यात आली आहे.तसेच या तोतया पत्रकाराची यापूर्वी अनेक रंजक किस्से असून गुजरात राज्यातील सुरत येथे एका डॉक्टर कडे लाखोंची खंडणी मागितल्या प्रकरणी गुजरात पोलिसात गुन्हा दाखल आहे या प्रकरणात तो बरेच दिवस गुजरात पोलिसांच्या ताब्यात होता.

फिर्यादी स.फौ.अनिल रामचंद्र अहीरे नेम- भडगाव पोलिस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि.११ रोजी रात्री ८वाजेच्या सुमारास भडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस ठाणे अंमलदार/बारनिशी कक्ष तसेच तहसिल आवारात. आरोपी विठ्ठल मराठे फिर्यादीस म्हणाला की तुम्ही पनाका का दाखल केली. ३०७ चा गुन्हा का दाखल केला नाही. विठ्ठल मराठे हा पोलीस स्टेशनला दारुच्या नशेत येवून मोठमोठ्याने आरडाओरड करुन अश्लिल शिवीगाळ केली. तसेच मी जर मंडप लावून उपोषणाला बसलो तर तुमच्या नोक-या खावून टाकेल तुमच्या जेवढा पगार आहे तेवढे माझे ढंपर चालतात अशी धमकी देवुन मी शासकीय गणवेशात कर्तव्यावर असतांना माझ्या शासकीय कामात अडथळा आणुन माझ्या अंगावर धावून आला व माझ्या शर्टचा कॉलर पकडुन माझ्या छातीवर जोरात बुक्क्याने मारल्याने माझ्या गणवेशावरील सर्वीस बँच तोडून टाकले तसेच पोलीस ठाणे अमंलदार यांचे कक्षातील बारनीशी यांचे जुने कॉम्पुटरचे सि.पी.यू जमनीवर आपटून नुकसान केले म्हणून माझी आरोपी विठ्ठल नामदेव मराठे (पाटील) वय-५५ वर्षे रा. वरची पेठ, भडगांव ता. भडगांव जि. जळगांव याच्या विरूद्ध न्या.सं. २०२३ प्रमाणे गु.र.न.कलम ४८५/२०२५ कलम १३२,१२१(१),२९६,११५(२),३५१(२),३५२,३२४(४), महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियम १९४९ चे कलम ८५(१), महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ११०,११२,११७, सार्वजनीक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande