थर्टी फर्स्ट साठी गोव्याची दारू बीड मध्ये येताच पकडली
बीड, 13 डिसेंबर, (हिं.स.)। थर्टी फर्स्टच्या आधीच बीडच्या उत्पादन शुल्क विभागाची गोवा राज्याची निर्मिती असलेल्या विविध विदेशी कंपन्यांची दारु राज्यात अवैधपणे विक्रीसाठी आणली जात होती. थर्टी फर्स्टसाठी ही दारु आणली जात होती. बीडच्या राज्य उत्पादन
थर्टी फर्स्ट साठी गोव्याची दारू बीड मध्ये येताच पकडली


बीड, 13 डिसेंबर, (हिं.स.)।

थर्टी फर्स्टच्या आधीच बीडच्या उत्पादन शुल्क विभागाची

गोवा राज्याची निर्मिती असलेल्या विविध विदेशी कंपन्यांची दारु राज्यात अवैधपणे विक्रीसाठी आणली जात होती. थर्टी फर्स्टसाठी ही दारु आणली जात होती. बीडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन ठिकाणी कारवाई करुन दारु व वाहतूक करणारी वाहने असा २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विश्वजीत देशमुख यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

माळवत्या वर्षाला निरोप देताना जंगी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यात दारूचा वापर होता. हे लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभाग सध्या अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यात नित्रुड शिवारात तेलगाव माजलगाव रोडवर पथकाने सापळा रचून कारवाई केली. यात गोवा राज्यातून आणलेली ९ बॉक्स दारु जप्त केली गेली. या कारवाईत एक कार व एक दुचाकीही जप्त केली. तर, दुसरी कारवाई केज शिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध दारु जप्त केली.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी व कारवाईसाठी ६ पथके तयार करण्यात आली आहेत.

उत्पादन शुल्क विभागाने दोन्ही प्रकरणात गुन्हा नोंदवून एकूण ६ आरोपींना अटक केली. ३ वाहने जप्त केली. या कारवाईत एकूण २५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande