पोलिस असल्याची बतावणी करून तीन वृद्धांच्या अंगठ्या लुटल्या
अमरावती, 13 डिसेंबर (हिं.स.) पोलिस अधिकारी असल्याचे भासवून वृद्धांची सवणूक करण्याच्या खळबळजनक घटना क्रवारी सकाळी जिल्ह्यातील बेनोडा आणि वोर्शी पोलिस स्टेशन परिसरात उघडकीस आल्या. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या संशयितांनी ७० वर्षा
पोलिस असल्याची बतावणी करून तीन वृद्धांच्या अंगठ्या लुटल्या  चौथा डाव मात्र फसला


अमरावती, 13 डिसेंबर (हिं.स.)

पोलिस अधिकारी असल्याचे भासवून वृद्धांची सवणूक करण्याच्या खळबळजनक घटना क्रवारी सकाळी जिल्ह्यातील बेनोडा आणि वोर्शी पोलिस स्टेशन परिसरात उघडकीस आल्या. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या संशयितांनी ७० वर्षावरील वृद्धांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या हिसकावून पळ काढला. मात्र वरुडमध्ये चौथी घटना घडवण्यात आरोपी अपयशी ठरले. चारही घटनांमध्ये दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार आरोपींचा सहभाग असल्याचे वृत्त आहे. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यानंतर, ग्रामीण पोलिस आणि एलसीबी फरार आरोपींचा सक्रियपणे शोध घेत आहेत.

पहिली घटना बेनोडा बस स्टँड सकाळी ९:४५ ते १०:०० च्यादरम्यान, दोनतरुण मोटारसायकलवरून बेनोडा गाव बस स्टँडवर आले. पोलिस असल्याचे भासवून त्यांनी दशरथ जंगलुजी खुरसांगे (७८, बेनोडा) व्यांच्याकडून ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरली. घरी परतल्यावर त्यांना एका कागदाच्या पॅकेटमध्ये दगड सापडले. तेव्हाच त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

दुसरी घटना - गाडेगाव-हतुर्णा रोड

दुपारी १२:४५ वाजता, त्याच टोळीने साहेबराव महादेवराव गावंडे (७७, अलोदा) व्यांना थांबवले आणि त्यांची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरली. पोलिस असल्याचे भासवून आरोपींनी त्यांना दंगलीची माहिती दिली आणि रुमालात गुंडाळलेले दगड दिले.

तिसरी घटना - मोर्शी परिसर

सकाळी १०:३० ते १०:४८ च्या दरम्यान,दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार आरोपींनी शालिक रामजी बाबाजी खैरकर (७६, येरळा) यांना सालबर्डी-पाला रोडवर थांबवले आणि पोलिस असल्याचे सांगून त्यांच्या ७ ग्रॅम आणि ८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande