
पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.)। भाजप युवा मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनाचे राजकीय पडसाद बारामतीत उमटले. भाजपच्या या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. महायुतीच्या सरकारमध्ये दोन्ही घटक पक्ष असताना भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी प्रसिध्दी मिळविण्यासाठी केलेली ही स्टंटबाजी असल्याचा आरोप संदीप बांदल यांनी या बाबत केला.महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) अंतर्गत विद्यार्थ्यांना देय असलेली 126 कोटी रुपयांची थकीत अधिछात्रवृत्ती व विद्या वेतन तात्काळ अदा करण्यात यावी, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग निवासस्थानासमोर आंदोलन केले गेले. अर्थात पोलिसांनी काही मिनिटातच या आंदोलकांना ताब्यात घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु