
अकोला, 15 डिसेंबर (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग 20 मधील 80 जागेवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भारतीय जनता पार्टी कार्यालयात घेण्यात आले. यामध्ये उच्चशिक्षित आयटी झालेले विद्यार्थी तसेच उद्योजक शेतकरी वेगवेगळ्या क्षेत्रातील 1224 उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकोला महानगरपालिकेची जय्यत तयारी करण्यात येत असून या दृष्टीने आज सकाळी दहा वाजता पासून आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात उमेदवारांचे मुलाखती घेण्यात आल्या. एसी वर्गातील 165, एसटी वर्गातील 35, ओबीसी 475, महिला 485, तर खुल्या वर्गासाठी 453, उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
उच्चशिक्षित पासून तर वेगवेगळ्या वर्गातील तसेच माजी नगरसेवक तसेच वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी सुद्धा मुलाखती दिल्या आहेत वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व वर्गातील अल्पसंख्याकासह उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे .
संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, निवडणूक प्रभारी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर,पालकमंत्री एडवोकेट आकाश कुंडकर, खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल, निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल महानगर अध्यक्ष जयंत मसने, डॉक्टर अमित कावरे, एडवोकेट रूपाली काकडे माधव मानकर यांनी मुलाखती घेतल्या.
पक्ष संघटनेत सर्व समान पक्षाने दिले धोरण भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष जयंत मसने तसेच निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांच्या सुद्धा मुलाखती घेण्यात आल्या.
पक्षाने सामाजिक तसेच विविध संघटना पक्ष संघटनेत जबाबदारी संघ भाजपा परिवार शी संबंधित विषयावर तसेच प्रभागातील वाढ रचना प्रभागातील सामाजिक समीकरण प्रभागातील ज्येष्ठ नागरिक वेगवेगळ्या संघटना सामाजिक संघटना याविषयी माहिती विचारून मतदार संख्या महिला जातीयनिहा तसेच वेगवेगळ्या सामाजिक चळवळ वेगवेगळ्या विषयावर तसेच निवडून आल्यानंतर निवडणूक विजन मतदारांविषयी व पक्षाविषयी बांधिलकी या विषयावर प्रश्न विचारण्यात आले.
पक्षात भारतीय जनता पक्षाने प्रथमच निवडणुकीमध्ये उमेदवाराकडून कोणतेही शुल्क न घेता मोफत फॉर्म भरून घेतले व सर्वांना खुले ठेवले सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारी मागण्याचा हक्क देऊन भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या मुलाखती प्रदेश भाजपाकडे प्रत्येक जागेसाठी तीन उमेदवारांचा पॅनल पक्षाकडे आजच पाठवण्यात येईल अशी माहिती भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी दिली.
आज सकाळी आठ वाजता पासून भारतीय जनता पक्ष कार्यालयात उमेदवार इच्छुक उमेदवारांची गर्दी होती रात्रीपर्यंत मुलाखती घेण्यात आल्या.
मॅरेथॉन मुलाखती चा सिलसिला भारतीय जनता पक्षाने सर्वप्रथम करून भारतीय जनता पक्षाकडे सर्वात जास्त उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे सर्व पक्षातील विविध युवा विशेषता युवा उमेदवारांनी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांनी उमेदवारी मागितली आहे.
पक्षाचा अंतिम निर्णय तसेच पक्षांनी तिकीट न दिल्यास बंडखोरी करणार का असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला व पक्षाच्या विषयी आपुलकी निष्ठा याची चाचणी घेण्यात आली.
भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या समित्या गठीत केल्या असून जवळपास 232 कार्यकर्ते जे निवडणूक लढणार नाही अशा कार्यकर्त्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे .
भाजपाचे संघटन सरचिटणीस सजय गोटफोडे, देवाशिष काकड, रमेश अल्करी, आम्रपाली उपरवट पवन महाले वैशाली शेळके सह कार्यकर्ते जबाब वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यावेळी पार पाडत होत्या. पक्षाकडे 48 नगरसेवकासह माजी 25 नगरसेवकांनी उमेदवारी मागितली आहे त्यामध्ये विविध पक्षातून आलेले उमेदवार यांचाही समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे