
अकोला, 15 डिसेंबर (हिं.स.)।
अकोला महानगरपालिका निवडणूक संदर्भात निवडणूक आयोगाने अधिकृतपणे निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली असून संपूर्ण निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) अकोला महानगरच्या वतीने पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे.
महानगर अध्यक्ष मो. रफिक सिद्दिकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज व आवश्यक डीडी लवकरात लवकर महानगर कार्यालय, सिंधी कॅम्प, अकोला येथे जमा करावेत. पक्ष संघटनात्मक तयारीच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
इच्छुक उमेदवारी अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2025 असून, त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेत आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन मो. रफिक सिद्दिकी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे