
अकोला, 15 डिसेंबर (हिं.स.)।
अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बि. चंद्रकांत रेड्डी आणि शहर उपविभाग पोलीस उपअधिक्षक सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३ भांदवि / १३७ (२) भा. न्या. सं वा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आज पर्यंत एकुण १२५ गुन्हे उघडकिस आणले आहेत.
पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन, अकोला येथील अप नं ८९/२०२५ क १३७ (२) भान्यांसं चा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला येथे दिनांक १९/०९/२०२५ रोजी प्राप्त झाली. सदर गुन्हयातील पिडीत व आरोपी यांचे बाबत गुप्त बातमीदारा मार्फत माहीती काढली असता सदर पिडीता व आरोपी हे कुर्कुभ ता दौड पुणे येथे राहत असल्याबाबत माहीती मिळवली. सदर प्रकरणी तपास व शोथ कामी वरीष्टांच्या मार्गदर्शनात विशेष तपास पथक तयार करून अ.मा.वा.प्र कक्ष येथील स्टॉप ग्राम कुर्कुभ पोस्टे दौड, जि. पुणे येथे रखाना करून मिळालेल्या माहीती नुसार कुकुंभ ता दौड पुणे येथील समाधान पवार यांचे कडे जावुन पिडीत व आरोपी यांचा शोध घेत असतांना पिडीत मुलगी व आरोपी हे मिळून आले. त्यांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष अकोला येथे परत आणुन पुढील तपासकामी तपास डायरी, पिडीत मुलगी व आरोपी यांना पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन, अकोला येथील पोलीस स्टॉप यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि पोलीस अधिकारी श्सुदर्शन पाटील शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी ही सपोनि कविता फुसे, मपोहेकों वैशाली रणविर, मपोहेकॉ शिल्पा मगर, सफौ राम गावंडे पोस्टे सिव्हिल लाईन, वाहन चालक पोकों भागवत काळे, पोका अजय राजपुत यांनी केली असुन लवकरच इतर गुन्हयामध्ये सुध्दा तत्परतेने पिडीत मुली व आरोपी यांचा कसुन शोध घेऊन गुन्हयांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला करित आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे