सोलापूर : जुन्या वाहनांच्या फिटनेस शुल्क दरात मोठी वाढ
सोलापूर, 15 डिसेंबर (हिं.स.) : देशातील जुन्या गाड्यांच्या फिटनेस शुल्कात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोठी वाढ केली आहे. त्याचबरोबर वाहनांच्या रिपासिंगचा कालावधी 15 वर्षांवरुन 10 वर्ष केला आहे. यामुळे देशातील जुन्या गाड्यांना वि
सोलापूर : जुन्या वाहनांच्या फिटनेस शुल्क दरात मोठी वाढ


सोलापूर, 15 डिसेंबर (हिं.स.) : देशातील जुन्या गाड्यांच्या फिटनेस शुल्कात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोठी वाढ केली आहे. त्याचबरोबर वाहनांच्या रिपासिंगचा कालावधी 15 वर्षांवरुन 10 वर्ष केला आहे. यामुळे देशातील जुन्या गाड्यांना विशेषतः मालवाहतूकदारांना मोठा फटका बसणार आहे. नवीन दर तत्काळ लागू करण्याचे आदेश दिले आहेत.जुन्या गाड्या 15 वर्षांनंतर कालबाह्य समजल्या जात होत्या. त्यानंतर त्यांची फिटनेस चाचणी घेऊन रिपासिंग केले जात होते. केंद्र सरकारने हा नियम बदलून त्याचा कालावधी 10 वर्षांपर्यंत खाली आणला आहे. तीन गटात वाहन फिटनेस चाचणी विभागण्यात आली आहे. 10 ते 15 वर्षे, 15 ते 20 वर्षे आणि 20 वर्षांवरील वाहने. त्याच बरोबर मालवाहतूक वाहनांसाठी 10,13,15 आणि 20 असे चार गट पाडण्यात आले आहेत.दुचाकींसाठी 200, एक हजार आणि दोन हजार शुल्क असणार आहे. तीनचाकी वाहनांसाठी 200, तीन हजार आणि सात हजार तर चारचाकी वाहनांसाठी 200, सात हजार आणि 15 हजार शुल्क आकारण्यात येणार आहे. ट्रक, टॅम्पो यासारख्या मालवाहतूक वाहनांसाठी एक हजार, पाच हजार, 15 हजार आणि 20 हजार असे शुल्क असणार आहे. सहा टायरपेक्षा जास्त हेवी मालवाहतूक वाहनांसाठी एक हजार, 5 हजार, 12 हजार आणि 25 हजार इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande