डोंबिवलीत हत्या प्रकरणी तिघांना अटक
डोंबिवली, 15 डिसेंबर (हिं.स.)। जुन्या भांडणातून झालेल्या वादात एका तरुणाची धारदार शास्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या झाल्याची घटना रविवारी १४ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील आयरेगावात घडली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याबाबत
Photo 1


डोंबिवली, 15 डिसेंबर (हिं.स.)।

जुन्या भांडणातून झालेल्या वादात एका तरुणाची धारदार शास्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या झाल्याची घटना रविवारी १४ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील आयरेगावात घडली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश गौरीशंकर बिराजदार , दिवाकर महेशचंद्र गुप्ता व आलिफ शहादाब खान अशी अटक आरोपीची नावे आहेत. तर नरेंद्र जाधव असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शुभम राजेश पांडे असे जखमी तरुणाचे नाव आहे.

घटनेतील मारेकऱ्यांनी नरेंद्र जाधव याला 'तू यहा क्यू आया, अब यहाँ से तुमको जाने नहीं देंगे, तुझे यही खतम कर देंगे, देखते है तुमको कौन बचाने आता है असे बोलून शिवीगाळ, दमदाटी करून चाकू, कोयता व लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर, मानेवर, गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर, हातापायावर ४० वार करून हत्या केली. त्याला वाचविण्यासाठी शुभम राजेश पांडे हा मधे पडला असता आकाशने त्याला शिवीगाळ करून तू बीच मे आया तो तुझे खतम कर देंगे अशी दमदाटी करून त्याचा डोक्यावर चाकूने वार करून व इतरांनी हाथाबुक्क्याने मारहाण केली.

मारेकऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३,१०९, ११५(२ ), ३५२, ३५१ (२ ),३(५), सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१ ),१३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटना घडलेल्या ठिकाणच्या परिसरातील सिसिटीव्ही कॅमेरेतून पोलिसांना मारेकऱ्यांची ओळख पटली. मारेकरी हे अंबरनाथ येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी तिघांना अटक केली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त परीमंडळ -3 अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनि गणेश जावदवाड, पोलीस निरीक्षक ( गुन्हे )राजेंद्र खेँडकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण, पोलीस हवालदार सुनील भणगे, देविदास चौधरी, पोलीस शिपाई शिवाजी राठोड, निलेश पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र सोनवणे, सचिन वरठा, मपोअं वेणू कळसे, सपोनि ईश्वर कोकरे, शहाजी नरळे, प्रविण घुटूकडे, सपोउपनिरीक्षक पाटणे, पोलीस हवालदार महेंद्र धुमाळ, निसार पिंजारी, पोलीस अंमलदार जयपाल मोरे, अजय बागुल, सुभाष बांभळे, दीपक ननावरे व शेखर कदम यांनी बजावली.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande