शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न
नांदेड, 15 डिसेंबर (हिं.स.)। एकनाथ हिरक महोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, हॉस्पिटल ठाणे तसेच आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत इको व हृदय तपासणी शिबि
Q


नांदेड, 15 डिसेंबर (हिं.स.)।

एकनाथ हिरक महोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, हॉस्पिटल ठाणे तसेच आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत इको व हृदय तपासणी शिबिराचे आज यशस्वी आयोजन करण्यात आले.

शिवसेना विधानसभा गटनेते आमदार श्री. हेमंतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नविन इमारत, श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक, जिल्हा रुग्णालय, शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, वजीराबाद, नांदेड येथे हे शिबिर पार पडले.

या शिबिरास आरोग्यदूत मंगेश चिवटे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील लहान मुलांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत मिळावी, यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. हृदयविकाराच्या वेळी वेळेवर तपासणी होणे अत्यंत महत्त्वाचे असून अशा शिबिरांमुळे अनेक मुलांचे प्राण वाचू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत लहान मुलांची मोफत 2D इको व हृदय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, आरोग्यदूत फाउंडेशनचे कार्यकर्ते, स्थानिक शिवसैनिक तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम एकनाथ हिरक महोत्सवाची सामाजिक जाणीव अधोरेखित करणारा ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande