पोलिस भरतीत होणार ‘एआय’चा वापर
पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.)। पोलिस भरतीप्रक्रियेत आणखी पारदर्शकपणा येण्यासाठी पुणे पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात येणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. परीक्षेत ‘फेस
पोलिस भरतीत होणार ‘एआय’चा वापर


पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.)। पोलिस भरतीप्रक्रियेत आणखी पारदर्शकपणा येण्यासाठी पुणे पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात येणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. परीक्षेत ‘फेस रेकग्निशन’ कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे लेखी, मैदानी चाचणी स्पर्धेत तोतया उमेदवार सहभागी होत असल्यास त्याला थांबवता येणार आहे.पुणे पोलिस दलातील एक हजार ८३३ पोलिस शिपाई पदाच्या जागांसाठी आत्तापर्यंत ८६ हजार २४० अर्ज दाखल झाले आहेत. कारागृह विभागातील शिपाई पदाच्या १३० जागांसाठी ९० हजार ७९१ अर्ज दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या भरतीप्रक्रियेसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande