
पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.) : पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या रेकॉर्डवरील मूळ आराखड्यानुसार (डीपीआर)राबविण्यात यावा, हा प्रकल्प झाल्यास पुणे–नाशिक अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण होईल. खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळून शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्याना विनंती केली जाईल. प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. तरीही प्रकल्प मार्गी न लागल्यास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व मी रस्त्यावर उतरून जनतेसोबत आंदोलनाचे नेतृत्व करू” असा इशारा राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.१४) शरदचंद्र पवार सभागृहात पुणे - नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्प मार्गाबाबत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वळसे पाटील बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,भारतीय जनता पक्षाचे डॉ. ताराचंद कराळे, जयसिंग एरंडे, , शिवसेनेचे सचिन बांगर, काँग्रेसचे अशोक काळे, आपचे सलीम इनामदार, विजय अढारी, बाजार समितीचे सभापती निलेश थोरात , रविंद्र करंजखेले, अरविंद वळसे पाटील.प्रवीण पारधी,प्रमोद बाणखेले, सागर काजळे, संदीप बाणखेले, संजय मोरे, जनाबाई उगले, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु