पुणे पोलिस आयुक्तालयात दोन नवीन परिमंडळे
पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.) : पुणे शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला आणि वाढत्या गुन्हेगारीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयात मोठी प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे. याअंतर्गत दोन नवीन परिमंडळांची आणि पाच नवीन पो
पुणे पोलिस आयुक्तालयात दोन नवीन परिमंडळे


पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.) : पुणे शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला आणि वाढत्या गुन्हेगारीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयात मोठी प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे. याअंतर्गत दोन नवीन परिमंडळांची आणि पाच नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पोलिस प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना करून दोन नवीन परिमंडळ निर्माण करण्याबाबत तसेच त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाला १३ ऑक्टोबर रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली. त्यानंतर राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande