
पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.) : पुणे - सातारा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एम. डी. इन्फ्रा कंपनीने मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व सेवा रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले आहे. या मार्गावर सेवा रस्त्याची रुंदी पूर्वी दोन मार्गिकेची होती, ती आता एकाने वाढून आता सेवा रस्ता तीन मार्गिकेचा झाला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे ते सातारा दरम्यान १२० किलोमीटर मार्गावर ज्या ठिकाणी सेवा रस्ता खराब झाला होता. शिवाय ज्या ठिकाणी रस्त्याची रुंदी वाढविणे शक्य होते. त्या ठिकाणी सेवा रस्त्याचे विस्तारीकरण केले आहे. सुमारे ४० किलोमीटरच्या अंतरावर सेवा रस्ता वाढविला आहे. १५ ते २० दिवसांत हे काम केले असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु