अमरावती महापालिकेसाठी शरद पवार गट सज्ज; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा आढावा दौरा
अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अमरावती दौरा करून निवडणूक तयारीचा आढावा
अमरावती महानगरपालिकेसाठी शरद पवार गट सज्ज; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा आढावा दौरा


अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अमरावती दौरा करून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. अमरावती येथील शासकीय विश्राम भवनात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत अमरावती महानगरपालिकेतील प्रभागनिहाय पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणी तसेच संभाव्य उमेदवारांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ही निवडणूक लढवली जाईल, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावेळी केली. महानगरपालिकेतील सत्ता मिळविण्यासाठी पक्षाने आतापासूनच नियोजनबद्ध तयारी सुरू केली असून, तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. आगामी काळात प्रभागस्तरावर बैठकांचे आयोजन करून संघटन अधिक मजबूत केले जाईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande