
पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.)। फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोतील कचऱ्याचे जैविक उत्खनन (बायोमायनिंग) कमी दराने करण्यास ज्या ठेकेदारांनी प्रक्रिया शुल्कासाठी प्रतिटन ७२५ रुपयांपेक्षा जास्त दर भरला होता, ते ठेकेदार आता प्रतिटन ५५० रुपयांनी करण्यास तयार होत आहेत.त्यांच्यासोबत महापालिका प्रशासनाची चर्चा सुरू असून, सोमवारपर्यंत सर्व ठेकेदार अंतिम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्थायी समितीची बैठक होणार असून, त्यात या सर्व निविदा मान्य केली जाण्याची शक्यता आहे.कचरा डेपोमध्ये २८ लाख टन कचरा पडून आहे. या कचऱ्याची २०२७ पर्यंत विल्हेवाट लावण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिलेले आहेत. त्यासाठी महापालिकेने प्रत्येकी ५.६० लाख टनाच्या पाच निविदा काढल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु