चंद्रभागा नदीपात्रात 200 बाल वारकर्‍यांकडून स्वच्छता
सोलापूर, 15 डिसेंबर (हिं.स.)श्री विठ्ठल - रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत आलेल्या भाविकांमध्ये चंद्रभागा स्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दर्शनासाठी आलेले भाविक हे प्रथम चंद्रभागा नदीत स्नान करण्यास महत्त्व देतात. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात भ
चंद्रभागा नदीपात्रात 200 बाल वारकर्‍यांकडून स्वच्छता


सोलापूर, 15 डिसेंबर (हिं.स.)श्री विठ्ठल - रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत आलेल्या भाविकांमध्ये चंद्रभागा स्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दर्शनासाठी आलेले भाविक हे प्रथम चंद्रभागा नदीत स्नान करण्यास महत्त्व देतात. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात भाविकांची सातत्याने गर्दी असते. मात्र, हे चंद्रभागा नदीपात्र व पात्रातील पाणी हे निर्माल्य, कचरा, फाटकी कपडे, शिळे अन्न यामुळे गढूळ आणि दूषित बनत आहे. त्यामुळे या घाण पाण्यात भाविकांना स्नान करावे लागत आहे. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावत आहेत. याची दखल घेऊन ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या 200 बाल वारकर्‍यांनी चंद्रभागा वाळवंट आणि पात्राची स्वच्छता केली आहे. या उपक्रमाचे वीकेंडला आलेल्या भाविकांनी स्वागत केले आहे.पंढरपूरला दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आणि दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक हा चंद्रभागेत स्नान करण्यासाठी उत्सुक असतो. मात्र, नाईलाजाने अस्वच्छ पाण्यात भाविकांना पवित्र स्नान करावे लागत आहे. खरे तर चंद्रभागा वाळवंटात दररोज स्वच्छता राखली गेली पाहिजे. मात्र, मंदिर प्रशासन व नगरपालिका प्रशासन हे यात्रा कालावधीत स्वच्छता करते. इतरवेळी मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने चंद्रभागा वाळवंटात, तसेच पुंडलिक मंदिर परिसरात निर्माल्याचे ढीगच्या ढीग साचलेले दिसून येतात. याची दुर्गंधी येथे पसरत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande