सोलापूर-गायरान जमिनीवरील मुरूम अवैधरित्या उपसला
सोलापूर, 15 डिसेंबर (हिं.स.)गायरान असलेल्या जमिनीवरील मुरूम अवैधरित्या उपसा करून नेल्याचा प्रकार घडला आहे. सराव करण्यासाठी मुलांकडून तयार करण्यात आलेला ट्रॅकदेखील मुरूम माफियाकडून उध्वस्त करण्यात आला आहे.त्यामुळे या मुलांच्या सरावाचा प्रश्न निर्माण
सोलापूर-गायरान जमिनीवरील मुरूम अवैधरित्या उपसला


सोलापूर, 15 डिसेंबर (हिं.स.)गायरान असलेल्या जमिनीवरील मुरूम अवैधरित्या उपसा करून नेल्याचा प्रकार घडला आहे. सराव करण्यासाठी मुलांकडून तयार करण्यात आलेला ट्रॅकदेखील मुरूम माफियाकडून उध्वस्त करण्यात आला आहे.त्यामुळे या मुलांच्या सरावाचा प्रश्न निर्माण झाला आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प व 33/11 के. व्ही. क्षमतेचे विद्युत सबस्टेशन उभारण्यासाठी शासनाने अधिकृतपणे सदर जागा मंजूर केली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. सदर जमिनीवर गावातील तरुण मुले पोलीस भरतीचा सराव करतात. त्यावरील मुरूम काढण्यात आला आहे.हा सर्व प्रकार घडत असताना प्रशासन मात्र मुरूम माफियावर कोणतीही कारवाई न करता निव्वळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीचे कुर्डु मुरूम प्रकरण अजून ताजे असताना सुद्धा गावातील अनेक ठिकाणी मुरूम उपसा बेसुमार प्रमाणात सुरु असल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत असून प्रशासनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande