पुणे -कात्रज तलावातील ३० हजार घनमीटर गाळ काढल्याचा पालिकेचा दावा
पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.)राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने एनडीएमए प्रकल्पांतर्गत जलसंपदा विभागाकडे गाळ काढण्याचे नियोजन सोपवले होते. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीही मंजूर करण्यात आला. पालिकेकडून जलसंपदा विभागाने एप
पुणे -कात्रज तलावातील ३० हजार घनमीटर गाळ काढल्याचा पालिकेचा दावा


पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.)राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने एनडीएमए प्रकल्पांतर्गत जलसंपदा विभागाकडे गाळ काढण्याचे नियोजन सोपवले होते. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीही मंजूर करण्यात आला. पालिकेकडून जलसंपदा विभागाने एप्रिल महिन्यात हा गाळ काढला असल्याचे सांगण्यात येत आहे. हा गाळ काढून तो तलावाच्या बाजूलाच साठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.पावसाळा लवकर सुरू झाल्याने हे काम अर्धवट अवस्थेतच थांबवण्यात आले. नागरिकांकडून या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून काढलेला गाळ तलावाच्या शेजारीच ठेवण्यात आल्याने तो पावसाळ्यात परत पाण्यासोबत तलावातच वाहून गेला आहे. त्यामुळे गाळ काढला कुठे आणि तो नेमका गेला कुठे? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही नागरिकांतून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande