पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलावर पुन्हा होणार दोन कोटींचा खर्च
पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.)सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौक ते फन टाइम थिएटर यादरम्यान नव्याने उभारण्यात आलेला उड्डाणपूल नियोजित मेट्रो मार्गासाठी ६६ ठिकाणी फोडला जाणार आहे. हे काम पुढील काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता असताना, या उड्डाणपुलाच्या
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलावर पुन्हा होणार दोन कोटींचा खर्च


पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.)सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौक ते फन टाइम थिएटर यादरम्यान नव्याने उभारण्यात आलेला उड्डाणपूल नियोजित मेट्रो मार्गासाठी ६६ ठिकाणी फोडला जाणार आहे. हे काम पुढील काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता असताना, या उड्डाणपुलाच्या विद्युतरोषणाईसाठी १ कोटी ८० लाखांचा खर्च करण्याचा घाट पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने घातला आहे. या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने नुकताच मंजुरी दिली आहे.सिंहगड रस्ता (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) परिसरातील वडगाव, धायरी, नऱ्हे, खडकवासला या गावांचा झपाट्याने विकास होत आहे. शिवाय, सिंहगड, खानापूर, पानशेत या परिसरातूनही शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सिंहगड रस्त्याला दुसरा पर्यायी मार्ग नसल्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने राजाराम पूल ते फन टाइम थिएटर यादरम्यान दोन उड्डाणपूल उभारले आहेत. एक उड्डाणपूल राजाराम चौकाजवळ आणि दुसरा विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरदरम्यान आहे. या उड्डाणपुलांचे काही टप्पे आधीच वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. माणिकबाग ते विठ्ठलवाडी या उड्डाणपुलाचा शेवटचा टप्पाही नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande