सोलापूर : ऊस दरासाठी शेतकरी संघटनांचा एल्गार
सोलापूर, 15 डिसेंबर (हिं.स.) : सोलापूर जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर न केल्याने शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारला आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको, भजन आंदोलन करत, काही कारखान्यांतील गव्हाणीत उतरुन गाळप बंद पाडले.स्वाभिमानी शेतकरी संघ
सोलापूर : ऊस दरासाठी शेतकरी संघटनांचा एल्गार


सोलापूर, 15 डिसेंबर (हिं.स.) : सोलापूर जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर न केल्याने शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारला आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको, भजन आंदोलन करत, काही कारखान्यांतील गव्हाणीत उतरुन गाळप बंद पाडले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर-पुणे महामार्गावरील भीमानगर येथे रास्ता रोको आंदोलन केल्याने अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. प्रतिटनाला 3500 रुपये दर जाहीर करावी, वजन काट्याची चौकशी करावी यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यावैळी सिद्धेश्वर घुगे, आदिनाथ परबत, हरिभाऊ माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बीबीदारफळ येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनहित शेतकरी संघटना या दोन्ही संघटनांनी गव्हाणीत उतरून गाळप बंद पाडले. उसाला पहिली उचल 3500 रुपये जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी शेतकर्‍यांनी भजन करत कारखाना प्रशासनाचे लक्ष्य वेधून घेतले. यावेळी प्रभाकर देशमुख, विजय रणदिवे, अमोल पाटील यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दर जकराया शुगर कारखान्याच्या गव्हाणीत उतरून शेतकर्‍यांनी गाळप बंद पाडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande