
छत्रपती संभाजीनगर, 17 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी सातारा, देवळाई, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, इटखेडा मंडळातील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. एकनाथ राजाराम काळे यांच्या पक्षप्रवेशानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली असून, संघटनात्मक दृष्ट्या हा पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरला.
यावेळी मा.महापौर श्री. बापू घडामोडे, निवडणुक प्रमुख श्री. समीर राजूरकर, मंडळातील जेष्ठ नेते विनायकराव हिवाळे पाटील तसेच मंडळ अध्यक्ष हृषिकेश भालेराव, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य व ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संजय जोरले, शहर सचिव प्रवीण कुलकर्णी, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, आप्पासाहेब हिवाळे, महिला मोर्चा मंडळाध्यक्ष सौ.शिल्पाताई सेलूकर, राहुल चाबुकस्वार, दिलीप काळे, दिलीप आरते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis