महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा सखोल आढावा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक
अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी,२०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी,२०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्‍या ८७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महानगरपालिकेच्‍या क्षेत्रात आचारसंहिता लागू
महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा सखोल आढावा* आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक


अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)।

अमरावती महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी,२०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी,२०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्‍या ८७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महानगरपालिकेच्‍या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची तयारी, नियोजन व अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. ही बैठक महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे पार पडली. अमरावती महानगरपालिकासाठी १५ जानेवारी,२०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान होणार आहे.निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्‍यापासून अमरावती महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. अमरावती महानगरपालिकेमध्‍ये बहुसदस्‍यीय प्रभाग पध्‍दतीमुळे प्रत्‍येक प्रभागात चार जागा तर प्रभाग क्र.९ मध्‍ये तीन जागा राहणार आहे. अमरावती महानगरपालिका निवडणूकीत ऑफलाईन पध्‍दतीने नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. अमरावती महानगरपालिका निवडणूकीसाठी ६ लाख ७७ हजार १८० मतदार असून त्‍यानुसार मतदान केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या निवडणूकीसाठी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्‍हीएम) मागणी करण्‍यात आली आहे. अमरावती महानगरपालिका निवडणूक मतदानाचे प्रमाण वाढविण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात मतदार जागृती करण्‍याचे निर्देश आयुक्‍तांनी दिले. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात नाविण्‍यपुर्ण उपक्रम राबवून मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍याच्‍या सुचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या. मतदान केंद्रावर जेष्‍ठ नागरीक, दिव्‍यांग, तान्‍हाबाळासह असणा-या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, आदींना मतदानासाठी प्राधान्‍य देण्‍याचे निर्देशही या बैठकीत देण्‍यात आले. काही ठिकाणी पिंक मतदान केंद्र तयार करण्‍याच्‍या सुचना यावेळी देण्‍यात आल्‍या. अमरावती महानगरपालिका निवडणूकीसाठी मा.विभागीय आयुक्‍त यांनी ८ निवडणूक निर्णय अधिकारी व ७ सहाय्यक निवडणूक अधिकारी क्र.१ यांचे नाव कळविलेले आहेत, त्‍यानुसार प्रभा‍गनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी क्र.१,२ व ३ यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. निवडणूकीसाठी लागणारे मनुष्‍यबळ उपलब्‍ध करुन घेण्‍यात येत आहे. आचारसंहिता कक्ष निर्माण करण्‍यात आला असून अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली. झोननिहाय आचारसंहिता दक्षता समिती कक्ष गठीत करण्‍यात आला आहे. माध्‍यम प्रमाणन व सनियंत्रण समिती तयार करण्‍यात आली आहे. पुरुष मतदार ३ लाख ३९ हजार १७७, महिला मतदार ३ लाख ३७ हजार ९३५, इतर ६८ असे एकुण ६ लाख ७७ हजार १८० मतदार राहणार आहे. अमरावती महानगरपालिकेत एकुण २२ प्रभाग तर एकुण ८७ जागा राहणार आहे. महिलांसाठी ४४ जागा, अनूसुचित जातीसाठी १५, अनूसुचित जमातीसाठी २, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी २३ आरक्षित आहे. उमेदवारांसाठी खर्च मर्यादा ९,००,००० रुपये आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande