स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आ.प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला
छत्रपती संभाजीनगर, 17 डिसेंबर, (हिं.स.) - हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरल्याची माहिती आहे. त्यांचे कार्यकर्त्यांनी मुंबई गाठली आहे. डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेत
Q


छत्रपती संभाजीनगर, 17 डिसेंबर, (हिं.स.) - हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरल्याची माहिती आहे. त्यांचे कार्यकर्त्यांनी मुंबई गाठली आहे. डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव हे 2014 ते 2019 दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव यांचं 2021 मध्ये निधन झालं. प्रज्ञा सातव यांचा उद्याच (18 डिसेंबर) भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी गटबाजीला कंटाळून निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशात तथ्य नसल्याचे म्हटलं आहे. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यात आली होती. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, कोरोना महामारीत अकाली निधनाने त्यांची राजकीय प्रवास कायमचा थांबला.

डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं 2021 मध्ये आजारपणामुळे निधन झाले. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. प्रज्ञा सातव या पहिल्यांदा 2021 मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या. 2030पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे.

राजीव सातव राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे भूषवली होती.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande