
नांदेड, 17 डिसेंबर (हिं.स.)।
माळेगाव येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात भरवली जाणारी पारंपरिक यात्रा लक्षात घेता, यात्रेच्या कालावधीत संबंधित टोलनाके तात्पुरते मुक्त करण्यात यावेत, अशी मागणी डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक, नागरिक व वाहनांची ये-जा होत असते. मात्र टोलनाक्यांमुळे भाविकांना आर्थिक तसेच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात टोलनाका शुल्क माफ करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
टोलनाका मुक्त केल्यास भाविकांची सुरक्षित व सुलभ वाहतूक होऊन यात्रेचे नियोजन अधिक सुकर होईल, तसेच स्थानिक नागरिक, व्यापारी व भाविकांना याचा मोठा फायदा होईल, असेही डॉ. धोंडगे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून यात्रेच्या कालावधीत टोलनाका शुल्कातून सूट द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis