नांदेड मध्ये निखिलेश देशमुख यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
नांदेड, 17 डिसेंबर, (हिं.स.)। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नेते प्रा. रविंद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी सभापती संजय पाटील बेळगे आणि युवक काँग्रेस अध्यक्ष शंकर पाटील शिंदे यांच्या प्रमु
नांदेड मध्ये निखिलेश देशमुख यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश


नांदेड, 17 डिसेंबर, (हिं.स.)। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नेते प्रा. रविंद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी सभापती संजय पाटील बेळगे आणि युवक काँग्रेस अध्यक्ष शंकर पाटील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत निखिलेश देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.

यावेळी निखिलेश देशमुख यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत संघटन मजबूत करण्यासाठी व जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थित नेत्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या पक्षप्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande