बनावट वेबसाईट्स, अॅप्सपासून सावध राहण्याचे आरटीओचे आवाहन
अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)। अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन आदी सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट्स, फसवे मोबाईल अॅप्स तसेच खोट्या लिक्सच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या
बनावट वेबसाईट्स, अॅप्सपासून सावध राहण्याचे आरटीओचे आवाहन


अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)।

अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन आदी सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट्स, फसवे मोबाईल अॅप्स तसेच खोट्या लिक्सच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या लक्षात आले आहे. या प्रकारांमुळे वाहन चालक व मालकांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे बनावट वेबसाईट व अॅप्स पासून सावधान राहण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे परिवहन विभागाने जारी केलेल्या एका पत्रकात सांगण्यात आले की, विभागाशी संबंधित सेवांसाठी नागरिकांनी केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा, वाहन नोंदणीसाठी VAHAN https://vahan.parivahan.gov.i ], ड्रायव्हिंग लायसन्ससाठी SARATHI [https://sarathi.parivahan.gov .in] परिवहन सेवांसाठी [https://www.parivahan.gov.in] तसेच ई-चलनासाठी [https://echallan.parivahan.gov.in] या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. ही सर्व संकेतस्थळे 'kgov.inl' या डोमेनने समाप्त होतात. kk.comll, kk.onlinell, kk.sitell, kk.inll अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाईटवर नागरिकांनी व्यवहार करू नयेत. फसवणूक करणाऱ्यांकडून बहुधा आपल्या वाहनावर चलन बाकी असून त्वरित दंड भरा'' किवा kkDL सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासणी करा' अशा धमकीवजा संदेशांसह अनधिकृत लिक्स पाठविल्या जातात. परिवहन विभाग किवा फळडकडून कधीही WhatsApp द्वारे पेमेंट लिक पाठविली जात नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.तसेच 'kRTO Services.apkll, kkmParivahan-Update.apkll, kkeChallan-pay.apkll यांसारखी अनधिकृत अॅप्स डाउनलोड करू नयेत. अशा अॅप्सद्वारे डळढ, बँकिग तपशील व मोबाईलमधील संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. कोणताही संशयास्पद संदेश किवा लिक प्राप्त झाल्यास नागरिकांनी तात्काळ National Cyber Crime Portal [https:// www. cyber crime.gov.in] वर तक्रार नोंदवावी किंवा सायबर फसवणूक हेल्पलाइन 1930 तसेच जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande