
पिंपरी, 17 डिसेंबर (हिं.स.)पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आठ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २४ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे स्थळ निश्चित केले आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे आदेश प्रसृत केले.
महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने होणार असून ३२ प्रभागातून १२८ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. चार प्रभागांकरीता एक असे आठ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सहायक म्हणून तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कामकाज पाहणार आहेत. प्रभाग क्रमांक १०, १४, १५ व १९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांची, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश डोईफोडे, निवेदिता घार्गे, वैशाली ननावरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे कार्यालय निगडी, प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु