रत्नागिरी : केंद्रीय उपक्रमामध्ये असुर्डे विद्यालयाची जिल्ह्यातून राज्य स्तरावर निवड
रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : सावर्डे (ता. चिपळूण) येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचालित असुर्डे-आंबतखोल येथील वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वच्छ एवम हरित विद्य
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अभिनंदन


रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : सावर्डे (ता. चिपळूण) येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचालित असुर्डे-आंबतखोल येथील वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वच्छ एवम हरित विद्यालय रेटिंग (SHVR) उपक्रमामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून राज्यस्तरावर निवड झाली.

कर्तव्यदक्ष मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक याउपक्रमात मनापासून योगदान केले. विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिल्याने व पालक तसेच संस्थेचे सहकार्य मिळाल्यामुळे विद्यालयाची राज्यस्तरासाठी निवड झाली. त्याबद्दल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यालयाने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूणचे आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडीक, ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे चेअरमन डी. ए. पाटील आणि सदस्य तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक यांनी मुख्याध्यापक अमर भाट आणि सहभागी सर्वांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande