लातुर मनपा निवडणुकीकरिता काँग्रेस भवनात इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती
लातूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाकडून नुकताच राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर लातूर शहर काँग्रेस कमिटीने या निवडणुकीसाठी नियोजन केले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार लातुर
अ


लातूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाकडून नुकताच राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर लातूर शहर काँग्रेस कमिटीने या निवडणुकीसाठी नियोजन केले आहे.

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार लातुर मनपा निवडणुकीकरिता काँग्रेस भवनात इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.

राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखतींचे नियोजन करण्यात आले होते.

या मुलाखतींच्या वेळी निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक डॉ. जितेंद्र देहाडे, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, प्रदेश सचिव-अ‍ॅड. समद पटेल, माजी महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, माजी महापौर प्रा. डॉ. स्मिताताई खानापुरे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, सेवादल शहराध्यक्ष सुपर्ण जगताप, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. फारुक शेख, ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष चंद्रकांत धायगुडे, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता राहावी यासाठी प्रभागांनुसार मुलाखतींचे वेळापत्रक ठरवण्यात आले होते.

लातूर शहरात काँग्रेसची पकड मजबूत करण्यासाठी आणि सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे या प्रक्रियेवरून स्पष्ट होत आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande