
सोलापूर, 18 डिसेंबर (हिं.स.)।
महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आकाराला येण्याच्या प्रक्रियेला सुरुवातीलाच हादरे बसू लागले आहेत. भाजपसोबत जाण्यासाठी शिंदेंची शिवसेना अगतिक झाल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेची सत्ता दीर्घकाळ भोगलेल्या काँग्रेसची भिस्त मित्रपक्षांवर आहे. अशीच स्थिती ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यावरच ते भाजपला आव्हान देऊ शकतील, अशी सद्यस्थिती आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष म्हणवून घेण्याच्या नादात माकपची अक्षरशः काँग्रेसमागे फरफट सुरू आहे. या सगळ्या गोंधळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेमात्र ‘अब की बार 75 पार’चा नारा देत महायुतीतच बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा डाव खेळल्याचे दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड