जळगाव : दिव्यांग सक्षमीकरणासाठी कार्यरत स्वयंदिप संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव, 18 डिसेंबर (हिं.स.) जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी चाळीसगाव येथील स्वयंदिप अपंग विकास बहुउद्देशीय संस्था यास भेट देऊन संस्थेच्या एकूण कामकाजाची तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी व आत्मनिर्भरता केंद्रित उपक्रमांची
जळगाव : दिव्यांग सक्षमीकरणासाठी कार्यरत स्वयंदिप संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी


जळगाव, 18 डिसेंबर (हिं.स.) जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी चाळीसगाव येथील स्वयंदिप अपंग विकास बहुउद्देशीय संस्था यास भेट देऊन संस्थेच्या एकूण कामकाजाची तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी व आत्मनिर्भरता केंद्रित उपक्रमांची नुकतीच पाहणी केली. या संस्थेमार्फत दिव्यांग महिला व व्यक्तींना सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. विशेषतः चाळीसगाव येथे दिव्यांग महिलांच्या सहभागातून सुरू करण्यात आलेल्या रेडिमेड कपडे निर्मिती युनिटची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पाहणी केली. या उपक्रमामुळे रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास व आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या कार्यपद्धती, उपक्रमांची अंमलबजावणी व सामाजिक योगदानाबाबत माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याबाबत प्रशासन सकारात्मक भूमिका बजावेल, असेही त्यांनी यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील , चाळीसगाव तसेच मुख्याधिकारी सौरभ जोशी, नगरपरिषद, चाळीसगाव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande