हिंदू महासभेची पुणे महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर
पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)। अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाची पहिलीआठ जणांची उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. हिंदू महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.पुणे महानग
हिंदू महासभेची पुणे महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर


पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)।

अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाची पहिलीआठ जणांची उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. हिंदू महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभा पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरत असून हिंदुत्ववादी विचारधारेवर आधारित विकासात्मक राजकारण हा पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

व्यावसायिक,पत्रकार,गृहिणी,सामाजिक कार्यकर्त्यांचा यादीत समावेश आहे.

पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या उमेदवार यादीत पुढील उमेदवारांचा समावेश आहे.विवेक परदेशी (प्रभाग२३ ड),प्रशांत भालेराव (प्रभाग २४ ड),सूर्यकांत कुंभार (प्रभाग२५ ब),तृप्ती तारे (प्रभाग२५ क),अजित जोशी (प्रभाग२५ड),नितीनशुक्ल (प्रभाग३४ ड),विद्या घटवाई (प्रभाग३५ ब), राजेंद्र देशपांडे (प्रभाग३७)हे उमेदवार निवडणूक लढणार असून पत्रकार परिषदेला उपस्थित होते

'मतदारांची आम्ही किंमत नाही करणार,आम्ही ना यात्रा काढणार, ना करमणूकीचे कार्यक्रम घेणार', सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि शहराचा सर्वांगीण विकास साधणे हा या उमेदवारांचा मुख्य उद्देश असेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला.चांगले, सुशिक्षित आणि मध्यम वर्गीय उमेदवार देऊन आम्ही फक्त दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा, सुरक्षित जीवन देण्याचा प्रयत्न करणार,असे आनंद दवे यांनी सांगितले.

या वेळी हिंदू महासभेचे प्रदेश सहकार्यवाह मनोज तारे, प्रदेश सरचिटणीस नितीन शुक्ल, प्रदेश संघटन प्रमुख उमेश कुलकर्णी,प्रदेश महिला समन्वयक सौ.अदिती जोशी, तसेच महिला आघाडीअध्यक्ष शिल्पा भोसले-बुडुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.उर्वरित प्रभागांसाठी उमेदवारांची पुढील यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असून निवडणूक प्रचार अधिक व्यापक स्वरूपात राबवला जाणार असल्याची माहिती हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande