जळगाव महापालिका मतदानासाठी सज्ज
जळगाव, 18 डिसेंबर (हिं.स.) जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारीचा वेग वाढवला असून, शहरातील १४५ इमारतींमध्ये एकूण ५१६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी ५३८ कंट्रोल युनिट व १,१३६ बॅलेट युनिट उपलब्ध
जळगाव महापालिका मतदानासाठी सज्ज


जळगाव, 18 डिसेंबर (हिं.स.) जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारीचा वेग वाढवला असून, शहरातील १४५ इमारतींमध्ये एकूण ५१६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी ५३८ कंट्रोल युनिट व १,१३६ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महापालिका मुख्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे तसेच सहायक आयुक्त उदय पाटील उपस्थित होते.

यावेळी आयुक्त ढेरे यांनी मतमोजणी होणाऱ्या एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदाम परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.मतमोजणीच्या ठिकाणी कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आरोग्य विभागामार्फत संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. मतदानाच्या आधी याच ठिकाणी मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम यंत्रे सील करून टॅगिंगसह सुरक्षितरित्या याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.मागील महापालिका निवडणुकीत जळगाव शहरात सुमारे ५४ टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांपेक्षा अधिक नेण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. यासाठी मतदार जनजागृती मोहिमा, नागरिकांशी थेट संवाद, तसेच विविध माध्यमांतून मतदानाबाबत आवाहन करण्यात येणार आहे. नागरिकांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande