
नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)। - राज्य शासनाचे वादग्रस्त माजी मंत्री माणिक कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे विशेष पथक मुंबईकडे रवाना झाले आहे ते रात्री मुंबईत दाखल होऊन कोकाटे यांचा शोध घेणार आहेत.
राज्य शासनाचे माजी मंत्री माणिक कोकाटे यांनी तीस वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून घर घेताना बोगस कागदपत्र दिली होती याबाबतची तक्रार ही स्वर्गवासीय माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी दाखल केलेली होती त्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन उपजिल्हाधिकारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीची स्थापना केली होती त्यामध्ये माणिक कोकाटे हे दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्या विरोधात सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुणाच्या निकालामध्ये 20 फेब्रुवारी 25 रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये दोन वर्षाची कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली होती या शिक्षण विरोधात माणिक कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अपील केलेले होते जिल्हा न्यायाधीश बिदर यांनी ही शिक्षा कायम ठेवली.
या शिक्षणानंतर जिल्हा अतिरिक्त न्यायालयाच्या वतीने अटक वॉरंट जारी करण्यात आलेले होते. त्यानंतर आज दुपारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली हे पथक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे रवाना झाला आहे मुंबईमध्ये रात्री दाखल झाल्यानंतर हे माणिक कोकाटे यांचा शोध घेणार आहेत त्यांना अटक करून पुढील कारवाई करणार आहेत. त्यामुळे आता माणिक कोकाटे यांची अटक जवळजवळ निश्चित म्हणली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV