
नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)
– राज्य निवडणूक आयोगाने नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर, इच्छुक उमेदवारांसाठी ना-हरकत दाखला (NOC) मिळविण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र ऑनलाइन एकखिडकी कार्यप्रणाली सुरू केली आहे. दोन दिवसात १48 इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केल्याने महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ७५ हजार रुपये जमा झाले आहेत.
महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांना मालमत्ता कर, पाणीपट्टी, जाहिरात, परवाने आदी कोणतीही थकबाकी नसल्याबाबत ना-हरकत दाखला सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी पूर्वी विविध विभागांत संपर्क करावा लागत असल्याने वेळ लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन आणि निवडणुकीचा कालावधी कमी असल्याने महापालिकेने २०२५–२६ निवडणुकीसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे.या प्रक्रियेनुसार इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही विभागीय कार्यालयात २ रुपये फॉर्म फी व ६०० रुपये शुल्क भरून पावती घ्यावी. त्यानंतरhttp://noc.nmc.gov.inया संकेतस्थळावर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज क्रमांक प्राप्त होतो. अर्जाची स्थिती व अंतिम ना-हरकत दाखला याच संकेतस्थळावरून पाहता व डाउनलोड करता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV