
परभणी, 18 डिसेंबर (हिं.स.)।
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत परभणीतील वरद विजय पेशकार यांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार) अंतर्गत अंमलबजावणी अधिकारी या पदासाठी निवड झाली आहे. पेशकार यांनी पुणे येथील एमआयटी महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी विषयातील पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. नोव्हेंबर 2024 मध्ये नवी दिल्ली येथील केंद्रीय लोकसेवा आयोग भवनात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या परीक्षेची मुलाखत पार पडली होती. या मुलाखतीत त्यांनी यश संपादन करत केंद्र सरकारच्या सेवेत प्रवेश मिळवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis