परभणी - वक्तृत्व आणि स्वरचित कविता स्पर्धेत यशवंत मकरंद यांचे यश
परभणी, 18 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी यांच्या वतीने शिक्षक व अधिकारी यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये वक्तृत्व आणि स्वरचित कविता या दोन्ही स्पर्धांमध्ये सावित्रीबाई फुले मुलींच
वक्तृत्व आणि स्वरचित कविता स्पर्धेत यशवंत मकरंद यांचे यश


परभणी, 18 डिसेंबर, (हिं.स.)।

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी यांच्या वतीने शिक्षक व अधिकारी यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये वक्तृत्व आणि स्वरचित कविता या दोन्ही स्पर्धांमध्ये सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल येथील इंग्रजी विषय शिक्षक यशवंत मकरंद यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून दुहेरी यश प्राप्त केले असून विभागीय स्पर्धेत ते परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विद्यानिकेतन शिक्षण संस्थेचे सचिव विधीज्ञ दिपकराव देशमुख, मुख्याध्यापिका सौ. जया जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande