फुरसुंगीत भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले
पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)। ऊरळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात हडपसरमधील फुरसुंगी भागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मुलासह दोघांना मद्य वाहतूक करताना पकडण्यात आले. या कारवाईत मद्याच्या बाटल्यासह मोटार असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल ज
फुरसुंगीत भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले


पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)।

ऊरळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात हडपसरमधील फुरसुंगी भागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मुलासह दोघांना मद्य वाहतूक करताना पकडण्यात आले. या कारवाईत मद्याच्या बाटल्यासह मोटार असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी वेदांत राहुल कामठे (वय १९), आकाश तुकाराम मुंडे (वय २४, दोघे रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुहास गवळी (वय ३६, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत कामठे हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल कामठे यांचा मुलगा आहे. गवळी हे निवडणूक आयोगाच्या पथकात नियुक्तीस आहेत. निवडणूक काळात या पथकाकडून आचारसंहिता पालन, तसेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande