
जळगाव, 18 डिसेंबर (हिं.स.) राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या 6 नगर परिषद मधील 09 प्रभागांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या 6 नगर परिषद मधील काही जागांवर सुधारीत निवडणुक कार्यक्रमानुसार मतदान पार पडणार आहे. या नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीतील ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती 19 डिसेंबर मतदानाचा अगोदरचा दिवस, 20 डिसेंबर मतदानाच्या दिवसापर्यंत संपुर्ण दिवस तसेच 21 डिसेंबर मतमोजणीचा दिवस मतमोजणी प्रक्रिया संपेप्रर्यंत जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदुर्णी, वरणगाव आणि यावल या नगरपरिषद आणि नगरपंचायत हद्दीतील ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.) यांनी दिले आहेत. या आदेशाचे जळगांव जिल्हयातील संबधीत सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी काटेकोर पालन करावे. जे अनुज्ञप्तीधारक सदर आदेशाचे उल्लघंन करतील, त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर